Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे, त्याआधी १५ नोव्हेंबर रोजी सर्व फ्रँचाझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यायची आहे.
IPL Auction
Sakal
याच दरम्यान आता असे वृत्त आले आहे की संजू सॅमसनला घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स रविंद्र जडेजाला राजस्थान रॉयल्ससोबत ट्रेड करण्याची शक्यता आहे.
Ravindra Jadeja
Sakal
संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने आणि रविंद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ साठी प्रत्येकी १८ कोटी रुपयांना संघात कायम केले होते.
Sanju Samson
Sakal
त्यामुळे दोघांची किंमत सारखी असल्याने ट्रेडिंगच्या चर्चा आहेत. मात्र राजस्थानला जडेजासह चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिसही हवा आहे.
Sanju Samson - Riyan Parag
Sakal
मात्र चेन्नई जडेजाशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला राजस्थानसोबत ट्रेड करण्यास तयार नसल्याचे समजत आहे.
Ravindra Jadeja - MS Dhoni
Sakal
या चर्चा सुरू असतानाच अचानक रविवारी (९ नोव्हेंबर) जडेजाने त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट डिऍक्टिव्हेट केल्याचे समजत आहे.
Ravindra Jadeja
Sakal
जडेजाचे इंस्टाग्रावर @royalnavghan या नावाने अकाऊंट आहे, मात्र सध्या हे अकाऊंट उपलब्ध नसल्याचे इंस्टाग्रामवर दाखवत आहेत.
Ravindra Jadeja deactivates Instagram account
Sakal
यामुळे आता जडेजा चेन्नईवर नाराज आहे का की त्याच्या त्याचं अकाऊंट डिऍक्टिव्हेट होण्यामागे वेगळंच काही कारण आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही, मात्र यावरून उलट सुलट चर्चा होत आहे.
Ravindra Jadeja
Sakal
Team India | Tata Sierra SUV Features
Sakal