Pranali Kodre
भारतीय महिला क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकली आणि इतिहास घडला.
India Women's Team
Sakal
या विश्वविजयानंतर भारतीय महिला संघाचे भरभरून कौतुक झाले, तसेच खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षावही झाला.
India Women's Team
Sakal
टाटा मोटार्सनेही घोषणा केली की येत्या २५ नोव्हेंबर रोजी रिलाँच होणारी Tata Sierra SUV कार वर्ल्ड कप विजेत्या भारतीय खेळाडूंना भेट देण्यात येणार आहे.
India Women's Team
Sakal
दरम्यान, या Tata Sierra SUV कारची वैशिष्ट्ये काय आहेत, जाणून घेऊ.
Tata Sierra SUV Features
या कारमध्ये पहिल्यांदाच ट्रिपल स्क्रिन डॅशबोर्ड डिझाईन केले आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मध्यवर्ती टचस्क्रीन इंफोटेनमेंट युनिट आणि समोरच्या प्रवाशासाठी स्वतंत्र स्क्रीन असेल.
Tata Sierra SUV Features
याशिवाय कारच्या स्टियरिंग व्हिलवर इल्युमिनेटेड लोगो दिसत आहे. तसेच बाहेरच्या डिझाईनमध्ये LED हेजलँम्प्स, सिग्नेचर ग्रिल आणि अॅथलेटिक बॉडी लाईन्स आहेत.
Tata Sierra SUV Features
दरम्यान, अद्याप इंजिनाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण काही रिपोर्ट्सनुसार 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.0-लीटर Kryotec डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे.
Tata Sierra SUV Features
तसेच मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध असू शकतात, याशिवाय या कारमध्ये डिजिटल इंटीरियर, कनेक्टेड फीचर्स, आणि ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टीम्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याची शक्यता आहे.
Tata Sierra SUV Features
याशिवाय या कारमध्ये, ७ एअरबॅग्स, टायर प्रेशनर मॉनिटरिंग सिस्टिम, पार्किंग सेन्सर, ऑटो एसी, सनरूफ, रिअर-विंडो सनशेड्स, ऑडिओ सिस्टिम, मल्टी ड्राईव्ह मोड्स यासांरख्या अनेक सुविधा असल्याचे म्हटले जात आहे.
Tata Sierra SUV Features
या कारची किंमत साधारण ११ लाखाच्या आसपास असू शकते.
Tata Sierra SUV Features
Abhishek Sharma | Haval H9 Car price and features
Sakal