Sandip Kapde
पुण्याच्या मध्यभागी एक काळी भव्य जलतरण तलाव अस्तित्वात होता.
या तलावाचं नाव 'शिवाजी तलाव' होतं आणि तो मुठा नदीच्या किनाऱ्यावर वसलेला होता.
हा तलाव १९४५ साली पुणे महापालिकेने शिवाजीनगरच्या दक्षिण भागात बांधला होता.
पूर्वी शिवाजीनगरला 'भांबुर्डे' म्हणून ओळखलं जात होतं.
१९४७ नंतर या भागाचं नाव बदलून 'शिवाजीनगर' करण्यात आलं.
पुण्याची जुनी वस्ती नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर होती, ज्याला 'कसबा पुणे' म्हणत.
जसजशी लोकसंख्या वाढली, तसतशी नदीच्या दुसऱ्या बाजूला नवी वस्ती तयार झाली.
भांबुर्ड्यात उच्चभ्रू वस्ती होती, ज्यांना जवळच सर्व सुविधा हव्या होत्या.
त्यांच्या मागणीवरून महापालिकेने जवळच जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतला.
शिवाजी तलाव तब्बल १०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद होता.
त्या काळी स्त्रिया व पुरुषांसाठी स्वतंत्र पोहण्याची व्यवस्था होती.
बुडणाऱ्यांसाठी दोन गार्ड सतत तलावाच्या देखरेखीत असायचे.
महिन्याचा पास दीड रुपयाला मिळत होता, तर प्रवेश फी केवळ सहा पैसे होती.
१९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्याने मुठा नदीच्या किनाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
त्याच घटनेनंतर शिवाजी तलाव अस्तित्वातून नाहीसा झाला आणि त्याजागी महापालिकेची इमारत आली.