Sandip Kapde
जंगली महाराज रस्त्याची कथा पुण्याच्या ऐतिहासिक रस्ते बांधणीचा अभिमान आहे.
१९७३ मध्ये पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्ते अक्षरशः उखडले गेले होते.
नगरसेवक श्रीकांत शिरोळे यांनी खड्ड्यांसाठी पावसाला जबाबदार धरल्याचा निषेध केला होता.
त्यांनी मुंबईतील रस्त्यांचे उदाहरण देऊन पुण्यातील रस्ते दर्जेदार का नाहीत यावर प्रश्न उपस्थित केला.
श्रीकांत शिरोळे यांनी रेकॉन्डो या कंपनीचा शोध लावून पुण्यासाठी उत्तम रस्ता बांधण्याचे काम सोपवले.esakal
रेकॉन्डो कंपनीचे संचालक दोन पारशी बंधू होते, ज्यांनी हॉट मिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला.
जंगली महाराज रस्ता बांधण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता.
रेकॉन्डो कंपनीने १० वर्षांत रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही, अशी हमी दिली होती.
१ जानेवारी १९७६ रोजी जंगली महाराज रस्त्याचे काम पूर्ण झाले.
आश्चर्य म्हणजे, पुढील ४८ वर्षांत या रस्त्यावर एकही खड्डा पडला नाही.
२०१३ मध्ये फक्त रस्त्याच्या कडेला डागडुजीचे काम करण्यात आले.
रेकॉन्डो कंपनीने वापरलेले हॉट मिक्स तंत्रज्ञान अन्य ठेकेदारांनीही उचलले.
दुर्दैवाने, पारशी बंधूंमध्ये झालेल्या वादामुळे रेकॉन्डो कंपनीने नवीन कामे बंद केली.
श्रीकांत शिरोळे यांची २४ व्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपदावर निवड झाली होती.
त्यांनी कमी वयातही आपल्या दूरदृष्टीने पुण्यातील रस्तेबांधणीचा नवा इतिहास रचला.