Anushka Tapshalkar
1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौदलाने राबवलेल्या यशस्वी ऑपरेशन ट्रायडेंटची आठवण म्हणून आज नौदल दिवस साजरा केला जातो , हे तर आपल्यला माहीतच आहे. पण भारतीय नौदलाबद्दलच या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
Indian Navy Day
sakal
भारतीय नौदलाच्या हवाई शाखेची स्थापना 11 मे 1953 रोजी इंडियन नेव्हल एअर स्क्वॉड्रन (INAS) 550 म्हणून झाली. आशियातील सर्वात जुनी हवाई शाखा असून आज विविध प्रकारच्या विमान आणि हेलिकॉप्टरसह सुसज्ज आहे.
1988 मध्ये भारताने पहिल्यांदा रशियाकडून INS चक्र ही अण्वस्त्र चालवणारी पाणबुडी भाड्याने घेतली. हे ऐतिहासिक पाऊल भारताच्या नौदलात भर घालणारे ठरले.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ नावाची अतिशय धाडसी मोहिम यशस्वीपणे पार पाडली होती.
भारतीय नौदलाने 1992 साली महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या बॅचचे स्वागत करत जेंडर इन्कलुसीव्हीटीकडे एक मोठे पाऊल टाकले.
Indian Female Navy Officer
sakal
भारतातील पहिले विमानवाहू जहाज INS विक्रांतने 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. आज त्याचा वारसा INS विक्रांत (IAC-1) या आपल्याच देशात तयार करण्यात आलेल्या विमानवाहू जहाजाच्या मार्फत पुढे चालवला जात आहे.
भारतीय नौदल युद्ध क्षमतेत अव्वल आहेच पण आपत्कालीन परस्थितीतून लोकांना सुरक्षित बाहेर काढणे, वैद्यकीय मदत पुरवणे आणि इतर साहाय्य यात नौदल आघाडीवर असते.
मरीन कमांडोज (MARCOS) हे जगातील सर्वोत्तम विशेष दलांपैकी एक आहेत. यामध्ये कॉम्बॅट डायविंग, दहशतवादविरोधी मोहिमा आणि असाधारण युध्दांसाठी प्रशिक्षित अधिकारी असतात.
INS अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी निर्मित अण्वस्त्र पाणबुडी आहे.
गोव्यातील नौदल हवाई संग्रहालय हे भारतीय नौदलाच्या हवाई इतिहासाचा खजिना आहे. येथे प्राचीन विमाने, हेलिकॉप्टर्स आणि नौदल हवाई क्षेत्राशी संबंधित विविध वस्तू पाहता येतात.
Pirate Flag Symbol
ESakal