Anuradha Vipat
प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकने मुलांच्या नॅनीसोबतच तिसरं लग्न केलं आहे अशा चर्चांना उधाण आलं आहे
या चर्चांवर अखेर अरमानच्या दुसऱ्या पत्नीने मौन सोडलं आहे.
अरमानने दोनदा लग्न केलंय. पायल आणि कृतिका या त्याच्या दोन पत्नी आहेत.
अरमानच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर कृतिका म्हणाली, तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही लक्ष्यचा वापर कंटेंटसाठी करतो, तर असं काहीच नाही.
पुढे कृतिका म्हणाली, ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. ती अरमानची तिसरी पत्नी आहे, असं तुम्हाला वाटतं. पण मी अनेकदा त्याबाबत स्पष्ट केलंय.
पुढे कृतिका म्हणाली, लक्ष्यनेही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. पायल आणि अरमाननेही सांगितलंय की असं काहीच नाही.
पुढे कृतिका म्हणाली, गेल्या तीन वर्षांपासून लक्ष्य आमच्यासोबत आहे. ती आमच्या मुलांचा सांभाळ करते. मुलांचे रील्स ती इन्स्टाग्रामवर शेअर करते.