हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट, यात नेमका फरक काय?

Pranali Kodre

Heart Attack & Cardiac Arrest

हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट हे दोन्ही हृदयविकाराशी संबंधित असले, तरी या दोन्ही वेगळ्या वैद्यकिय स्थिती आहेत.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

समस्या कशाची?

थोडक्यात सांगायचे झाले, तर हार्ट अटॅक रक्ताभिसरणासंदर्भातील (Blood Circulation) समस्या आहे, तर कार्डियाक अरेस्ट ही हृदयाच्या विजेच्या वहनाची (Electrical) समस्या आहे.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

मुख्य कारण

हार्ट अटॅकमध्ये रक्त पुरवणाऱ्या धमन्यांमध्ये (Arteries) अडथळा निर्माण होतो, तर कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयाची धडधड/इलेक्ट्रिकल सिस्टीम अचानक बिघडते.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

हृदयाची स्थिती

हार्ट अटॅकमध्ये हृदय धडधडत असलं तरी काही भागाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, तर कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय धडधडणे अचानक थांबते.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

रुग्णाची स्थिती

हार्ट अटॅकमध्ये बहुतेकवेळा रुग्ण शुद्धीवर असतो, पण कार्डियाक अरेस्टमध्ये क्षणार्धात रुग्ण बेशुद्ध होतो आणि श्वास थांबतो.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

हार्ट अटॅकची लक्षणे

छातीत मध्यभागी किंवा डाव्या बाजूला तीव्र वेदना, डाव्या हाताला कळ मारणे, मान-पाठीत वेदना, घाम येणे, मळमळणे ही हार्ट अटॅकची लक्षणे आहेत.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

कार्डियाक अरेस्टची लक्षणे

अचानक चक्कर येणे, धाडकन खाली पडणे, नाडी (Pulse) न लागणे ही कार्डियाक अरेस्टची लक्षणे आहेत.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

तात्काळ उपचार गरजेचा

हार्ट अटॅकमध्ये तात्काळ उपचार न मिळाल्यात तो कार्डियाक अरेस्टमध्ये बदलू शकतो, त्यामुळे रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेणे महत्त्वाचे असते.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

कार्डियाक अरेस्ट प्राणघातक

कार्डियाक अरेस्ट हा थेट प्राणघातक असतो, काही मिनिटात रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

तात्काळ CPR

कार्डियाक अरेस्टमध्ये तात्काळ CPR छातीवर हाताने सतत दाब देणे आवश्यक आहे किंवा AED Machine उपलब्ध असल्यास वापरणे.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Heart Attack vs. Cardiac Arrest

|

Sakal

विणकाम केवळ छंद नाही, तर टेन्शन आणि डिप्रेशनवरील वरदान

Mental Health Benefits of Crochet

|

Sakal

येथे क्लिक करा