संत्री आणि मोसंबीत काय फरक असतो?

संतोष कानडे

मोसंबी

संत्री आणि मोसंबी ही दोन्ही लिंबूवर्गीय फळे असून त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

नारंगी

संत्र्याचा रंग प्रामुख्याने नारंगी, तर मोसंबीचा रंग हिरवट किंवा पिवळसर असतो.

गोड

संत्र्याची चव गोड आणि आंबट असते, तर मोसंबीची चव साधारणपणे सौम्य गोड असते.

दोन्ही फळं

संत्र्याचा सुगंध मोसंबीपेक्षा अधिक तीव्र असतो. अनेकांना ही दोन्ही फळं आवडतात तर काहींना यातलं एकच.

व्हिटॅमिन सी

संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात मिळतात.

पोषक घटक

मोसंबीमध्येही व्हिटॅमिन सी, पाणी आणि शरीराला आवश्यक पोषक घटक असतात.

तंतू

संत्र्याच्या फोडींमध्ये रसासोबत तंतू मिळतात, त्यामुळे संपूर्ण फळ खाणे फायदेशीर ठरते.

चवीला सौम्य

मोसंबीचा रस चवीला सौम्य असल्यामुळे अनेकांना तो पिणे आवडते; मात्र संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले.

फळाचा आकार

दोन्ही फळांमधील पोषक घटकांचे प्रमाण, फळाचा आकार, जात आणि पिकण्याच्या अवस्थेनुसार बदलू शकते.

आहारात समावेश

त्यामुळे संत्री आणि मोसंबी दोन्ही आरोग्यासाठी चांगली असून, आपल्या आवडीनुसार दोन्ही फळांचा आहारात समावेश करता येतो.

चौदा वर्षांपूर्वी 'त्याने' अंतराळातून घेतली पृथ्वीवर उडी, पुढे...

<strong>येथे क्लिक करा</strong>