तुमची सर्व सरकारी कागदपत्रे आता DigiLocker अॅपमध्ये!

Monika Shinde

DigiLocker अॅप

DigiLocker अॅपद्वारे तुमची सर्व महत्त्वाची सरकारी कागदपत्रे मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवू शकता. आधार, पॅन, लायसन्स सारखी डॉक्युमेंट्स नेहमी फक्त एका क्लिकवर उपलब्ध राहतात.

DigiLocker App

|

Esakal

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मिशन

ही सेवा भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनचा भाग आहे. नागरिकांना फिजिकल फाइल न नेता अधिकृत कागदपत्रे डिजिटल फॉरमॅटमध्ये वापरण्याची मुभा देते.

DigiLocker App

|

Esakal

डिजिटल डॉक्युमेंट्स

DigiLocker मधील डिजिटल डॉक्युमेंट्सना फिजिकल प्रत इतकीच कायदेशीर मान्यता मिळते. रेल्वे, ट्रॅफिक पोलीस, सरकारी कार्यालये ही डिजिटल कागदपत्रे स्वीकारतात.

DigiLocker App

|

Esakal

DigiLocker डाउनलोड करा

Android किंवा iOS वर DigiLocker डाउनलोड करा, भाषा निवडा आणि मोबाइल नंबरने नोंदणी करा. OTP टाकून तुमचे खाते काही क्षणात तयार होते.

DigiLocker App

|

Esakal

मोबाइल नंबर वापरा

Aadhaar जोडण्यासाठी तुमचा आधार-लिंक मोबाइल नंबर वापरा आणि पडताळणी करा. त्यानंतर 6-अंकी सुरक्षा PIN सेट करून तुमचे खाते सुरक्षित करा.

DigiLocker App

|

Esakal

Issued Documents

Issued Documents मध्ये जाऊन विभाग निवडा. UIDAI मधून आधार किंवा इनकम टॅक्स विभागातून PAN काही सेकंदात आपोआप Fetch होऊन सेव्ह होते

DigiLocker App

|

Esakal

सर्व कागदपत्र आता एकाच अॅपमध्ये

ड्रायव्हिंग लायसन्स, बर्थ सर्टिफिकेट किंवा शिक्षण प्रमाणपत्रेही संबंधित विभाग निवडून सहज मिळतात. लायसन्ससाठी MoRTH निवडा आणि नंबर टाकल्यानंतर डॉक्युमेंट त्वरित उपलब्ध होते.

DigiLocker App

|

Esakal

हिवाळ्यात का खावे पेरू?

येथे क्लिक करा