Anuradha Vipat
पंजाबी प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ आणि त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दिलजीतची ‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’ जगभरात सुरू आहे.
भारतात दिल्लीपासून ‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’मधील कॉन्सर्टची सुरुवात झाली.
नुकताच दिलजीतचा पुणे येथे लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला.
यावेळी दिलजीतने मराठीत संवाद साधला. याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतं आहे.
या व्हिडीओमध्ये दिलजीत मराठीत बोलताना दिसत आहे. तो म्हणतो, “कसे आहात पुणेकर? दिलजीत दोसांझ आला हो…मुलगी शिकली प्रगती झाली.”
दिलजीतचा या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.