टीमला बसखालीच ढकललं! कार्तिक तमिळनाडूच्या पराभवानंतर हे काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

मुंबईने तमिळनाडूचा एक डाव आणि तब्बल 70 धावांनी पराभव करत 48 व्यांदा रणजी ट्रॉफीची फायनल गाठली.

मात्र या पराभवानंतर तमिळनाडूचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी संघाचा कर्णधार साई किशोरला जबाबदार धरलं.

प्रशिक्षकांची ही गोष्ट तमिळनाडूचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकला आवडली नाही. त्याने ट्विट करून यावर नाराजी व्यक्त केली.

कार्तिक म्हणाला की, प्रशिक्षकांनी खूप चुकीचं केलं, मी खूप निराश आहे.

तब्बल 7 वर्षानंतर तमिळनाडू रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये पोहचली होती. आता कुठं चांगल्या गोष्टी घडत आहेत.

प्रशिक्षकांनी कर्णधाराचं कौतुक करण्याऐवजी त्यांच्यावर आगपाखड केली. हे त्यांनी संघाच्या कर्णधाराला अन् संपूर्ण संघालाच बसखाली ढकलण्यासारखं आहे.

रोहित धरमशालेत करणार मोठा धमाका, एक षटकार अन् WTC चं रेकॉर्ड ब्रेक!