बारा हजार वर्षांपूर्वी विलुप्त झालेलं खतरनाक जनावर परतलं

संतोष कानडे

विलुप्त

विलुप्त झालेला प्राणी पुन्हा जिवंत करण्याच्या बायोटेक फर्मच्या मिशनला मोठे यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी शास्त्रज्ञांना यशस्वी प्रयोग कला.

डायर वुल्फ

'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेत दिसलेला डायर वुल्फ पृथ्वीवरून १२ हजार वर्षांपूर्वी विलुप्त झाला होता. या प्राण्याबद्दल माणसाच्या मनात कुतूहल आहे.

शास्त्रज्ञांचं यश

डलास (USA) येथील कोलोसॉल बायोसायन्सेसने तीन डायर वुल्फ पिल्लांना पुन्हा जिवंत केले. ही घटना चालू वर्षाच्या सुरुवातीची आहे.

तंत्रज्ञान

कोलोसॉलने त्यांच्या जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हा वैज्ञानिक चमत्कार घडवून आणला. याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं.

खलीसी

शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तीन पिल्लं जन्माला घातली. रोमुलस, रेमस आणि खलीसी अशी त्यांची नावं. एका मादी वुल्फचे नाव लोकप्रिय पात्रावरून 'खलीसी' असे ठेवले आहे.

२५ पट मोठे

हे डायर वुल्फचे पिल्लू ग्रे वुल्फच्या पिल्लांपेक्षा २० ते २५% मोठे असून मोठे झाल्यावर त्यांचे वजन १४० पाउंड (६३ किलो) पर्यंत पोहोचेल. सामान्य लांडग्यांपेक्षा हे मोठे असतात.

टायगर

या यशानंतर कंपनीने वूली मॅमथ, डोडो आणि तस्मानियन टायगरलाही परत आणण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

विज्ञान

या वैज्ञानिक प्रगतीबद्दल नैतिक प्रश्न उपस्थित होत आहेत. चांगलं की वाईट याबद्दल अनेकांमध्ये मतमतांतरे आहेत.

कधीही पर्यटनाला जाऊ नये, अशी पाच ठिकाणं

येथे क्लिक करा