Anushka Tapshalkar
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात काही अप्रतिम पर्यटनस्थळे आहेत, जी अजूनही अनेकांसाठी अज्ञात आहेत.
राजापूरच्या गंगेचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात. जमिनीत उगम पावणारी कुंडे हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे!
राजापूरचे महत्त्व यादव काळापासून आहे. आजही ती एक महत्त्वाची व्यापारी पेठ आहे.
अर्जुना नदीच्या मुखाशी वसलेले जुवे बेट हे कौलारू घरे, आंबा-काजूची बाग, आणि अप्रतिम सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे!
जुवे बेटाचा शांत आणि निसर्गरम्य परिसर हे ठिकाण फोटोग्राफीसाठी आदर्श बनवतो.
राजापूर जवळील उन्हाळे गावात बाराही महिने गरम पाण्याचे झरे आहेत! पावसाळ्यात अनुभव अधिकच खास असतो!
स्थानिकांच्या मते, देवीच्या चरणांमुळेच या झऱ्यांची निर्मिती झाली आहे.
उन्हाळ्याचे निसर्गसौंदर्य आणि शांततेचा अनुभव तुम्हाला ताजेतवाने करतो.
अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांच्या संगमावर वसलेले हे प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे.