Anushka Tapshalkar
अंटार्कटिकातील ब्लड फॉल्स हा धबधबा, जो टेलर ग्लेशियरमधून वेस्ट लेक बॉनीमध्ये वाहतो, त्याच्या लालसर रंग आणि गोठत नसलेल्या पाण्यामुळे एक नैसर्गिक आकर्षणच आहे.
भूगर्भशास्त्रज्ञ थॉमस ग्रिफिथ टेलर यांनी 1911 मध्ये या नैसर्गिक निर्मितीचा शोध घेतला. त्यानंतर हा धबधबा ज्या दरीतून वाहतो त्या टेलर दरीला त्यांचे नाव दिले.
आधी हे पाणी लाल शेवाळामुळे लाल होतं असा समज होता, पण रक्ताच्या रंगाचं कारण म्हणजे लोहमिश्रित पाणी, जे हवेसोबत संपर्कात येताच लाल रंगात बदलते.
-१९°C च्या तपमानातही हे पाणी द्रव स्थितीत राहते कारण त्यात जास्त मीठ असल्यामुळे त्याचा गोठण्याचा बिंदू कमी होतो.
ब्लड फॉल्सचे पाणी १.५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या खाऱ्या पाण्याच्या तलावातून येते, जेव्हा हा प्रदेश तलावाखाली बुडालेला होता.
ब्लड फॉल्सच्या पाण्यात ऑक्सिजनशिवाय, अंधारातही जीवाणू केमोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे उर्जा निर्माण करून जगतात.
ब्लड फॉल्समधील सूक्ष्मजीव सिद्ध करतात की पृथ्वीवरील सर्वात कठीण परिस्थितींमध्येही जीवन टिकू शकते.