पपईच्या पानांचे सेवन करा अन् 'या' 7 समस्यांपासून मिळवा सुटका

Aarti Badade

पपईच्या पानांचे फायदे

पपई फळासोबतच तिच्या पानांचे सेवन देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पपईच्या पानांच्या विविध उपयोगांनी अनेक आजार बरे होऊ शकतात.

Papaya leaves health benefits | sakal

पपईच्या पानांचा रस

पपईच्या पानांचा रस डासांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रोगांचा सामना करण्यास मदत करतो आणि त्यापासून होणाऱ्या समस्यांना टाळता येते.

Papaya leaves health benefits | Sakal

व्हिटॅमिन सी

पपईच्या पानांमध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते, जे रोगप्रतिकारक शक्तीला वाढवते आणि शरीराला विविध आजारांपासून वाचवते.

Papaya leaves health benefits | Sakal

प्लेटलेट संख्या

पपईच्या पानांचा रस प्यायल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते.

Papaya leaves health benefits | Sakal

दाहक-विरोधी गुणधर्म

पपईच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे हंगामी आजार, अ‍ॅलर्जी आणि श्वसन संबंधित संसर्गांपासून आराम मिळवता येतो.

Papaya leaves health benefits | Sakal

पचनक्रिया सुधारते

पपईच्या पानांचा रस पिण्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोटफुगी, अपचन आणि इतर पचनासंबंधी समस्या दूर होतात.

Papaya leaves health benefits | Sakal

डिटॉक्स

पपईच्या पानांचा रस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते.

Papaya leaves health benefits | Sakal

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध

पपईच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हे त्वचेला निरोगी ठेवतात आणि बुरशीजन्य संसर्ग आणि मुरुमांपासूनही संरक्षण करतात.

Papaya leaves health benefits | Sakal

'या' सोप्या 9 टिप्स फॉलो करा अन् चमकदार त्वचा मिळवा

Glowing Skin | Sakal
येथे क्लिक करा