सकाळ डिजिटल टीम
दररोज एकाच वेळी झोपण्याची सवय लावा.
जड किंवा तिखट पदार्थ टाळा, यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
झोपण्यापूर्वी तासभर तरी मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणे टाळा.
झोपताना आवाज आणि त्रासदायक वातावरण टाळा.
झोपताना खोलीत हलका आणि शांत वातावरण निर्माण करणारा प्रकाश असू द्या.
झोप येत नसेल तर काही वेळ सकारात्मक पुस्तक वाचल्याने झोप लागण्यास मदत होते.
पहाटे लवकर उठल्यास रात्री वेळेवर झोप लागते.
दररोज साधारण साडेदहा वाजता झोपून पहाटे ५-५:१५ च्या दरम्यान उठल्याने आरोग्य उत्तम राहते आणि मन प्रसन्न राहते.