सकाळ डिजिटल टीम
फळे संपूर्ण स्वरूपात खाल्ल्यास त्यातील फायबर्स मिळतात, जे पचनक्रियेस मदत करतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
फळांचा रस घेताना फायबर्स नष्ट होतात आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते, ज्यामुळे लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिकार आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असली तरी शरीर त्याचा वापर रिफाइंड साखरेप्रमाणेच करते, ज्यामुळे इन्शुलिन रिस्पॉन्स पटकन येतो आणि ब्लड शुगर वाढते.
फळे खाण्याची योग्य मात्रा महत्त्वाची आहे. दिवसभरात जास्तीत जास्त एक-दोन संपूर्ण फळे खाणे फायदेशीर ठरेल.
हंगामी आणि स्थानिक फळे अधिक पौष्टिक आणि ताज्या असतात. आयात केलेली फळे रासायनिक प्रक्रिया करून साठवली जातात, ज्यामुळे त्यांचे पोषणमूल्य कमी होऊ शकते.
उपाशीपोटी फळे खाल्ल्यास इन्शुलिन रिस्पॉन्स वाढतो. त्यामुळे जेवणानंतर स्वीटडिश म्हणून फळांचा समावेश करा.
लो-कार्ब फळे ज्या फळांचा Glycemic Index कमी आहे, त्यात डाळिंब, पेअर, पेरू, जांभळे, बेरीज आणि कलिंगड यांचा समावेश करा.