Apurva Kulkarni
दिवगंत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियननं लॉकडाऊनमध्ये 9 जून 2021 रोजी आत्महत्या करत जीवन संपवलं.
दरम्यान आता दिशाच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल करत दिशावर सामुहिक अत्याचार झाल्याचं म्हटलं आहे.
याचिकेत आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.
कर्नाटकच्या उडुपी याठिकाणी जन्मलेली दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर होती.
तिने वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं.
याशिवाय ती बऱ्याच जाहिरातींच्या एजन्सीसोबतही जोडली गेली होती.
टीव्ही अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती आणि मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता.