Monika Shinde
अनेकांना भयानक, विचित्र किंवा अस्वस्थ करणारी स्वप्नं पडतात. असं मानतो की स्वप्नं ही फक्त मनाची कल्पना नसतात. ती अनेक वेळा आपल्या मनात दडलेल्या भावना, इच्छा किंवा भीती यांचं प्रतिबिंब असतात.
स्वप्नांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होतो. कधी-कधी ती भविष्यातील एखाद्या घटनाचा संकेत देतात, तर काही वेळा कोणत्या तरी समस्येबाबतची चेतावणी असते.
वृंदावनातील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांच्याकडे एक भक्त आला आणि त्याने विचारलं "महाराज, कधी कधी स्वप्नांत अशा गोष्टी घडतात की त्याचा त्रास जागेपणीही होतो. काही वेळा वाटतं की आपली वाईट कर्मं आपण स्वप्नांतच भोगतो. हे खरं आहे का?"
कधी कधी असं होतं की आपण स्वप्नात अशा घटना पाहतो, ज्या आपल्याला अस्वस्थ करतात. उदाहरणार्थ, स्वप्नात पाय अचानक एखाद्या बेडूक किंवा लहान जीवावर पडतो आणि तो मरतो. आपली ती इच्छा नसते, पण तरीही ते घडतं.
त्या नंतर स्वप्नात आपल्याला एखादी शिक्षा भोगावी लागते जसं की आपल्याला कोणीतरी मारतं, वेदना होते. हे सगळं खूप भयंकर वाटतं. आणि झोपेतून उठल्यावरही मन अशांत राहतं, असं वाटतं की काही तरी वाईट घडलं.
अशा प्रकारची स्वप्नं, ही आपल्या अनावधानाने केलेल्या पापकर्मांशी संबंधित असतात. आपण ती कृती जाणीवपूर्वक केली नसली, तरी त्याचा परिणाम आपण स्वप्नांतून अनुभवतो.
प्रेमानंद महाराज स्पष्ट करतात की, प्रत्येक स्वप्नाचं अर्थ लावायचं नसतं. काही स्वप्नं मनाच्या थकव्यामुळे किंवा विचारांच्या गोंधळामुळेही पडतात, ज्याचा आपल्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही.
जर स्वप्नात भगवान, देवता किंवा संत दिसले, तर ते सौख्य, शांती आणि कृपेचा संदेश असतो. अशा स्वप्नांचं जीवनात सकारात्मक परिणाम होतो. देवाचं स्वप्नात दर्शन होणं ही परम कृपेची अनुभूती आहे.