दिविजा फडणवीस दहावीत उत्तीर्ण – किती टक्के गुण मिळवलेत?

Aarti Badade

दिविजा फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस ICSE बोर्डाच्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

Divija Fadnavis | sakal

गुण

दिविजाने ९२.६०% गुणांसह दहावी परीक्षा उत्तीर्ण केली. तिच्या या यशावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Divija Fadnavis | sakal

अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनी सोशल मीडिया (X / Twitter) वरून दिविजाच्या यशाची बातमी आणि अक्षय्य तृतीयेनिमित्त गृहप्रवेशाची गुड न्यूज शेअर केली.

Divija Fadnavis | sakal

ICSE दहावी निकाल

ICSE बोर्डाचा निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर झाला असून, यावर्षी ९९.०९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Divija Fadnavis | sakal

मुलींनी मारली बाजी

मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.३७%, तर मुलांची ९८.८४%. मुलींचं यश पुन्हा अधोरेखित झालं आहे.

Divija Fadnavis | Sakal

परीक्षेची कालावधी आणि विषय

या परीक्षेत ६७ विषयांसाठी पेपर्स घेण्यात आले. परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२५ दरम्यान पार पडली.

Divija Fadnavis | sakal

वेबसाईट

विद्यार्थी आपला निकाल cisce.org किंवा result.cisce.org या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

website | Sakal

रोहित शर्माचे 'हे' पाच रेकॉर्ड मोडणं कठीण!

Rohit Sharma | X/ICC
येथे क्लिक करा