Pranali Kodre
भारताचा कर्णधार रोहित शर्मा ३० एप्रिलला आपला वाढदिवस साजरा करतो.
रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४०० हून अधिक सामने खेळताना १८ हजारांहून अधिक धावा केल्यात.
यादरम्यान त्याने अनेक विक्रमही केले, ज्यातील काही विक्रम मोडणं कठीण आहे.
रोहितने वनडे क्रिकेटमध्ये तीन वेळी द्विशतक ठोकले आहे. असा पराक्रम करणारा तो सध्या तरी एकमेव क्रिकेटपटू आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने ३० एप्रिल २०२५ पर्यंत ४९९ सामन्यांत सर्वाधिक ६३७ षटकार मारले आहे. ६०० हून अधिक षटकार मारणारा तो सध्या एकमेव खेळाडू आहे.
रोहितने २०१९ वनडे वर्ल्ड कपमध्ये ५ शतके केली होती. तो एकाच वनडे वर्ल्डकपमध्ये ५ शतके करणारा सध्या तरी एकमेव क्रिकेटपटू आहे.
रोहित आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १५० हून अधिक सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे. तसेच सध्यातरी एकमेव भारतीय खेळाडू आहे.
रोहित आयसीसीच्या वनडे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टी२० वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशीप अशा चारही स्पर्धांमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवणारा पहिला क्रिकेटपटू आहे.