विवाहानंतर घटस्फोट का होतात? जाणून घ्या प्रेमानंद महाराज यांच्याकडून खरं कारण

Monika Shinde

प्रेमानंद महाराज

वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज म्हणतात “प्रेम म्हणजे निष्ठा, संयम आणि जबाबदारी. केवळ आकर्षणावर उभारलेले नाते कधीच टिकत नाही.

प्रेमविवाह का तुटतात?

महाराज सांगतात, आज बहुतेक प्रेमविवाह प्रेमासाठी नाहीत, तर इच्छा पूर्ण करण्यासाठी होतात. त्यामुळे नातं स्थिर राहत नाही आणि घटस्फोटाची वेळ येते.

लग्न म्हणजे पवित्र संस्कार

हिंदू धर्मानुसार, विवाह हा सोळा संस्कारांपैकी एक आहे. हे फक्त सामाजिक बंधन नाही, तर आत्म्यांचं पवित्र एकत्रीकरण आहे.

धर्माशिवाय घर टिकत नाही

महाराज सांगतात, धर्म हा घराचा पाया आहे. धर्माचा आधार घेतल्याशिवाय प्रेम आणि संसार दोन्ही अपूर्ण राहतात.

खरी प्रेमकहाणी

जर लग्नानंतर प्रेम टिकवायचं असेल, तर निष्ठा आणि समर्पण आवश्यक आहे. एकदा स्वीकारलेलं नातं आयुष्यभर निभावावं.

सात फेऱ्यांमागचा अर्थ

विवाहातील सात फेरे म्हणजे सात वचने निष्ठा, विश्वास, सहकार्य, प्रेम आणि धर्माचरण. हेच वैवाहिक जीवनाचं अधिष्ठान आहे.

सहधर्मचारिणीचा अर्थ

स्त्री ही फक्त पत्नी नाही, ती ‘सहधर्मचारिणी’ आहे. पतीच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणं हेच खऱ्या विवाहाचं सौंदर्य आहे.

प्रेमाचा खरा अर्थ

महाराज म्हणतात “प्रेमात स्वार्थ नसेल, तर ते दिव्य आहे. धर्म आणि निष्ठेच्या आधारावर उभं राहिलेलं नातं कधीही तुटत नाही.

रात्री ही ४ पाने खा, सकाळी पोट होईल एकदम हलकं आणि स्वच्छ!

येथे क्लिक करा