Apurva Kulkarni
दिव्या भारतीने लहान वयातच यशाचं शिखर गाठलं होतं. परंतु वयाच्या 19 व्या वर्षी दिव्याचा एक रहस्यमय मृत्यू झाला होता.
मृत्यू बालकीतून पडल्यामुळे झाल्याचं बोललं जातं. परंतु ती एक र्दुघटना होती की आत्महत्या हे अजूनही अनुत्तरीत आहे.
90 च्या दशकात दिव्याने आपल्या अभिनयातून आपली एक वेगळी छाप पाडली होती. 4 ते 5 वर्षातच दिव्याला मोठं यश मिळालं होतं.
परंतु दिव्याला तिच्या मृत्यूबाबत आधीच कल्पना मिळाली होती. दिव्याची मैत्रिणी आयशा जुल्का यांनी याबाबत खुलासा केला.
आयशाने सांगितलं की, 'दिव्या अनेक वेळा म्हणायची की, जल्दी करो जल्दी करो जिंदगी बहुत छोटी है'
त्या पुढे म्हणाल्या की, 'दिव्याला आधीच तिच्या मृत्यूची कल्पना होती. त्यामुळे ती नेहमी म्हणत की, मला लवकर यश मिळालं म्हणजे माझं आयुष्य कमी असेल.'
परंतु आज सुद्धा हे स्पष्ट झालं नाही की, दिव्याचा मृत्यू हा घातपात होता की, र्दुघटना.