दिवाळीसाठी ५ मिनिटांत तयार करा खमंग, कुरकुरीत इन्स्टंट जलेबी!

Anushka Tapshalkar

दिवाळी

दिवाळी सण फराळासोबत मिठाईशिवाय अपूर्ण आहे. विशेषतः काजूकतली आणि जिलेबी सर्वांच्या आवडीच्या आहेत. चला तर मग घरच्या घरी ५ मिनिटांत खमंग आणि कुरकुरीत जिलेबीची रेसिपी शिकूया.

Diwali Sweets

|

sakal

साखरेचा पाक तयार करा

पॅनमध्ये २०० ग्रॅम साखर आणि अर्धा कप पाणी घालून मध्यम आचेवर गरम करा. त्यात वेलची पूड आणि केशर मिसळा. एकतारी पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा.

Make Sugar Syrup

|

sakal

बॅटर तयार करा

२५० ग्रॅम मैदा, १ टेबलस्पून तूप आणि थोडं पाणी घालून एकसारखं, घट्ट पण ओतता येईल असं मिश्रण बनवा.

Make Batter

|

sakal

रंग आणि ईनो घाला

थोडासा खायचा केशरी रंग (ऐच्छिक) घाला. तळण्याआधी १ पाकीट ईनो टाकून हलके मिक्स करा.

Add Eno and Colour

|

sakal

तूप/तेल गरम करा

कढईत मध्यम आचेवर तूप किंवा तेल तापवा.

Put Ghee or Oil in Pan

|

sakal

जिलेबी बनवा

बॅटर पाईपिंग बॅग किंवा स्क्विझर बॉटलमध्ये टाकून जिलेबी गोलाकार फिरवा.

Make Jalebi

|

sakal

कुरकुरीत होईपर्यंत तळा

जिलेबीला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग होईपर्यंत तळा.

Fry Till Crispy

|

sakal

पाकात बुडवा आणि सर्व्ह करा

गरम जलेबी लगेच कोमट साखरेच्या पाकात घाला, ३० सेकंद ठेवा आणि बाहेर काढा. गरमागरम खाण्यासाठी द्या!

Serve Hot

|

sakal

Diwali Home Decor Ideas: दिवाळीसाठी सजवा घर या ७ जबरदस्त आयडियाजने!

Diwali Home Decor Ideas 

|

sakal

आणखी वाचा