Anushka Tapshalkar
दिवाळी आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. आज हा सण संपूर्ण जगभरात 'Festival of Lights' म्हणून साजरा केला जात आहे.
Countries that Celebrate Diwali Other than India
sakal
नेपाळमध्ये दिवाळीला 'तिहार' किंवा 'स्वान्ति' असे म्हणतात. हा सण पाच दिवसांचा असतो आणि त्यात कावळा, कुत्रा, गाय, लक्ष्मी आणि भावंडांचा सन्मान केला जातो.
Nepal
sakal
रावणाचा पराभव झाल्यानंतर विभीषणाने लंकेत दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली. आजही येथे अमावास्येच्या रात्री दिवे प्रज्वलित केले जातात.
Shri Lanka
sakal
सिंगापूरमध्ये दिवाळीला सार्वजनिक सुट्टी दिली जाते. हा सण रंगीबेरंगी दिवे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिठाईसह साजरा केला जातो.
Singapore
sakal
मलेशियामध्ये हिंदू सूर्य कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात दीपावली साजरी केली जाते. मंदिरे आणि घरं दिव्यांनी सजवली जातात.
Malaysia
sakal
कॅनडातील टोरोंटो आणि व्हॅंकुव्हरमध्ये दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मेळावे, फटाके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Canada
sakal
मॉरिशसमध्ये दिवाळीला सार्वजनिक सुट्टी असते. लोक घरांची सजावट करतात, दिवे प्रज्वलित करतात आणि गोड पदार्थांचे वितरण करतात.
Mauritius
sakal
या देशात दिवाळीला राष्ट्रीय उत्सव म्हणून मान्यता आहे. विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन हर्षोल्हासाने साजरी करतात.
Trinidad and Tobago
sakal
Diwali Sweets
sakal