दिवाळीत फटाके उडवताना भाजलं तर काय करावं?

Anushka Tapshalkar

दिवाळीत फटाके उडवताना घ्या काळजी!

दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करताना थोडीशी निष्काळजीपणाही गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरू शकते. अशावेळी भाजल्यास योग्य प्रथमोपचार माहीत असणे गरजेचे आहे.

Diwali

|

sakal 

भाजल्यास सर्वप्रथम थंड पाणी वापरा

फटाक्यांमुळे त्वचा भाजल्यास सर्वप्रथम जखम झालेला भाग किमान १० ते २० मिनिटे स्वच्छ, थंड वाहत्या पाण्याखाली धरा. यामुळे त्वचेचा वाढता दाह आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

non healing wounds vitamin c deficiency

|

esakal

अंगावरील दागिने आणि घट्ट कपडे काढा

भाजलेल्या भागावर सूज येण्यापूर्वी हातातील अंगठ्या, घड्याळ, कडे किंवा इतर घट्ट दागिने अलगद काढून ठेवा. मात्र, कपडे त्वचेला चिकटले असतील तर ते जबरदस्तीने ओढून काढू नका.

Gold Jewellery Price

|

ESakal

भाजलेली जखम स्वच्छ कापडाने झाका

थंड पाण्याचा उपचार केल्यानंतर भाजलेल्या भागावर स्वच्छ, कोरडे आणि सैलसर सुती कापड किंवा निर्जंतुक न चिकटणारी पट्टी हलकेच ठेवा. जखमेवर थेट कापूस लावणे टाळा.

Spinach Supports Faster Wound Healing

|

esakal

चुकूनही बर्फ किंवा घरगुती उपाय करू नका

भाजलेल्या त्वचेवर बर्फ, टूथपेस्ट, तूप, तेल, हळद, पीठ किंवा शाई लावू नका. अशा गोष्टींमुळे त्वचेची इजा वाढू शकते आणि संसर्गाचा धोकाही निर्माण होऊ शकतो.

History of ice

|

sakal 

त्वचेवर आलेले फोड फोडू नका

भाजल्यानंतर त्वचेवर पाण्याचे फोड आल्यास ते स्वतः फोडण्याची चूक करू नका. यामुळे जखमेत संसर्ग होण्याची शक्यता वाढते. जखमेला वारंवार हात लावणेही टाळा.

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

गंभीर भाजल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा

भाजलेली जखम खोल असल्यास, चेहरा, हात, डोळे किंवा संवेदनशील भाग भाजल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. डोळ्याला फटाक्यांमुळे इजा झाल्यास घरगुती उपाय न करता ताबडतोब रुग्णालयात जा.

Doctor's Advice | sakal

पुढच्या दिवाळीत सोन्याचा भाव किती होईल?

How Much Will Gold Cost Next Diwali

|

eSakal

आणखी वाचा