दिवाळी सुट्टी स्पेशल! महाराष्ट्रातील 7 बेस्ट हिल स्टेशन अन् बीच स्पॉट्स

Aarti Badade

यंदाची दिवाळी खास करा!

दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि सुट्टीचे दिवस! या दिवसांत कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत.

Sakal

माथेरान (Matheran)

मुंबईजवळचं हे शांत हिल स्टेशन. इथे गाड्यांना प्रवेश नाही, त्यामुळे स्वच्छ हवा आणि घोडेसवारीचा आनंद घ्या. परिवारासाठी परफेक्ट.

Sakal

लोणावळा-खंडाळा (Lonavala-Khandala)

दिवाळीच्या सुट्टीत सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण. टायगर पॉईंट, भुशी धबधबा मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत धमाल करा.

महाबळेश्वर आणि पाचगणी

महाबळेश्वर : स्ट्रॉबेरी, डोंगररांगा आणि थंडगार हवामानासाठी प्रसिद्ध. पाचगणी : टेबललँड, गुहा आणि शांत, रम्य वातावरण. फॅमिली पिकनिकसाठी योग्य.

Sakal

भंडारदरा (Bhandardara)

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रोमँटिक स्पॉट, कॅम्पिंग, बोटिंग आणि रात्रभर आकाशातील तारे पाहण्यासाठी बेस्ट. हा स्पॉट कपल्ससाठी एकदम खास आहे.

Sakal

अलिबाग (Alibaug)

समुद्रकिनारा आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध. दिवाळीत बीचवरच्या सुंदर सूर्योदयाचा आनंद घ्या. समुद्रकिनाऱ्याजवळ रिलॅक्स होण्यासाठी उत्तम.

Sakal

तारकर्ली (Tarkarli)

कोकणातील स्वर्गासारखं ठिकाण,स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि बीच वॉक्सचा अनुभव घ्या. दिवाळीत इथले वातावरण अधिक सुंदर असते.

Sakal

नागपूरजवळील 'बोधलकसा शिव मंदिर' जिथे अनुभवता येते नैसर्गिक सौंदर्य अन् मनःशांती!

Bodalkasa Tourism nagpur

|

Sakal

येथे क्लिक करा