दिवाळीत पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Anushka Tapshalkar

दिवाळी

दिवाळीत अनेक जणांना फटाके वाजवायला फार आवडतात. मात्र याचा लहान बाळ, वृद्ध आणि सर्वात जास्त तर प्राण्यांना होतो. तेव्हा त्यांची काळजी घेण्यासाठी पुढे दिलेल्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात.

Diwali Pet Care Tips

|

sakal

आवाजाची भीती!

दिवाळीच्या फटाक्यांचा प्रचंड आवाज पाळीव प्राण्यांना भीती दाखवतो. ते कोपऱ्यात लपून बसतात, थरथर कापतात किंवा बेचैन होतात. त्यांच्या तणावाची काळजी घेणे आवश्यक आहे.

Diwali Pet Care Tips

|

sakal

त्यांच्या सुरक्षित जागेचा आदर करा

जर कुत्रा किंवा मांजर लपण्यासाठी जागा शोधत असेल, तर त्यांना तिथेच राहू द्या. पडदे लावा, टीव्ही चालू करा किंवा हलके संगीत वाजवा. त्यामुळे आवाज कमी होईल आणि त्यांना शांतता मिळेल.

Diwali Pet Care Tips

|

sakal

नेहमीचा आहार ठेवा कायम

दिवाळीत गोड पदार्थ आणि तळलेले खाणे टाळा. चॉकलेट, सुकामेवा किंवा ग्रेव्हीज पाळीव प्राण्यांसाठी हानिकारक असू शकतात. त्यांच्या नियमित आहारावर लक्ष केंद्रित करा.

Diwali Pet Care Tips

|

sakal

आवाजापासून संरक्षण

दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. शक्य असल्यास प्राण्याला शांत खोलीत ठेवा. बाहेर फटाके फुटत असतील तर त्यांच्यापासून शक्य तितके दूर ठेवा.

Diwali Pet Care Tips

|

sakal

त्यांच्यासोबत वेळ घालवा

दिवाळीत प्राण्यांना एकटे सोडू नका. त्यांना आवडणारे ट्रीट्स द्या, त्यांच्यासोबत खेळा, त्यांना कुशीत घ्या. तुमचे प्रेम त्यांच्या तणावाला कमी करेल.

Diwali Pet Care Tips

|

sakal

पाणी नेहमी जवळ ठेवा

फटाक्यांच्या आवाजाने पाळीव प्राणी घाबरतात आणि धाप लागल्यासारखे होतात. त्यामुळे त्यांच्या जवळ नेहमी पाण्याचे भांडे भरून ठेवा.

Diwali Pet Care Tips

|

sakal

फटाक्यांचे अवशेष व मिठाई टाळा

फटाक्यांचा कचरा आणि मिठाया त्यांच्यापासून लांब ठेवा. त्यांचे सेवन केल्यास विषबाधा होऊ शकते. पाळीव प्राण्यांसाठी विशेष सुरक्षित ट्रीट्स द्या आणि दिवाळीचा आनंद त्यांच्यासोबत साजरा करा.

Diwali Pet Care Tips

|

sakal

फक्त भारतातच नाही तर 'या' 7 देशातही दिवाळीचा असतो खास उत्सव

आणखी वाचा