Monika Shinde
यंदा १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. या पवित्र काळात सौभाग्य, सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ही शुभ कामे करण्यास विसरू नका
दिवाळीच्या आधी घराची पूर्ण स्वच्छता करा. रांगोळी, तोरण, आकाशकंदील लावा. स्वच्छता ही लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी पहिला आणि आवश्यक टप्पा मानला जातो.
धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी, सोने, स्टील किंवा घरगुती उपयोगाच्या वस्तूंची खरेदी करावी. यामुळे घरात धन आणि स्थैर्य टिकते, असे मानले जाते.
दिवाळीच्या मुख्य दिवशी लक्ष्मीपूजन अवश्य करा. लक्ष्मी माताची विधिपूर्वक पूजा केल्यास घरात धन, यश आणि शांतता नांदते.
दिवाळी हा कुटुंब एकत्र येण्याचा सण आहे. सर्वांनी एकत्र बसून फराळ खावा, गप्पा कराव्यात. यामुळे प्रेम व नातेसंबंध दृढ होतात.
दिवाळीचा खरा आनंद म्हणजे इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे. अन्न, कपडे, गोडी यांचे वाटप गरजूंना करा. पुण्य मिळते आणि समाधानही.
फटाके वाजवताना मर्यादा पाळा. पर्यावरणाची काळजी घ्या. दिव्यांनी आणि सजावटीने घर उजळवा, पण निसर्गाचे संरक्षण करायला विसरू नका.