खूप वेळ बसून राहता? तुमचं शरीर काय सांगतंय ते जाणून घ्या

Monika Shinde

खूप वेळ बसून राहता का?

दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतात. ही सवय टाळली नाही, तर आरोग्य बिघडू शकतं.

ऊर्जेचा वापर घटतो

बराच वेळ बसून राहिल्यास शरीर कॅलरी खर्च करत नाही. यामुळे वजन वाढतं आणि स्थूलपणास सुरुवात होते.

स्नायू आणि हाडं कमकुवत होतात

हलचाली कमी केल्यामुळे स्नायूंमध्ये ताकद राहत नाही. हाडंही कमजोर होतात आणि दुखण्यांची शक्यता वाढते.

प्रमुख आजारांचा धोका

जास्त बसल्यामुळे टाइप २ मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढ, हृदयविकार आणि मासिक पाळीच्या तक्रारी वाढू शकतात.

थोडेसे बदल

फोनवर बोलताना उभं राहा, दर तासाला थोडं चालून घ्या. असे छोटे बदल आरोग्यास फायदेशीर ठरतात.

पालेभाज्यांचा समावेश करा

गडद हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. त्या हृदय व किडनीच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

पालकाचे फायदे

पालक ही उत्कृष्ट पालेभाजी आहे. ती रक्तवाहिन्यांचा ताठरपणा कमी करते आणि हृदयाच्या कार्यासाठी उपयुक्त ठरते.

निरोगी आयुष्य हवे?

मग बसण्याची सवय कमी करा, दररोज थोडी हालचाल वाढवा आणि आहारात पालेभाज्यांचा भरपूर समावेश करा.

पुरणपोळीपासून खवापोळीपर्यंत: महाराष्ट्रीय पारंपरिक पोळ्यांची गोष्ट

येथे क्लिक करा