Aarti Badade
सण-उत्सवात हवी असलेली खुसखुशीत चकली बनवण्यासाठी प्रथम डाळी आणि तांदूळ भाजून भाजणी तयार करणे आवश्यक आहे. पाक न करता बनणारी ही चकली झटपट होते.
Crispy Chakli Recipe
Sakal
भाजणीसाठी लागणारे साहित्य (अंदाजित १ किलोसाठी) तांदूळ ५०० ग्रॅम, हरभरा डाळ २५० ग्रॅम, उडीद डाळ १२५ ग्रॅम, मूग डाळ १०० ग्रॅम, पोहे ५० ग्रॅम, डाळे ५० ग्रॅम, अख्खे धणे २५ ग्रॅम, जिरे १५ ग्रॅम.
Crispy Chakli Recipe
Sakal
तयार भाजणी २ वाट्या, पाणी १ ते १.५ वाटी (गरजेनुसार), तेल ३-४ चमचे (मोहनसाठी), लाल तिखट १ चमचा (आवडीनुसार), हळद १/४ चमचा, तिळ १ चमचा, मीठ चवीनुसार, हिंग चिमूटभर.
Crispy Chakli Recipe
Sakal
सर्व डाळी, तांदूळ, धणे, जिरे, पोहे आणि डाळे स्वच्छ धुवून निथळून घ्या. सर्व घटक स्वतंत्रपणे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावेत आणि ते बारीक दळून भाजणी तयार करावी.
Crispy Chakli Recipe
Sakal
भाजणीत तिखट, हळद, तीळ, हिंग, मीठ आणि गरम तेल (मोहनसाठी) घालून चांगले चोळा. यामुळे चकलीला खुसखुशीतपणा येतो. नंतर थोडे थोडे गरम पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्या.
Crispy Chakli Recipe
Sakal
तयार कणकेचा गोळा चकलीच्या साच्यात भरा. एका ताटात गोल चकल्या पाडून घ्या. मध्यम आचेवर तेल चांगले गरम झाल्यावर चकल्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
Crispy Chakli Recipe
Sakal
चकली तळण्यासाठी तेल चांगले गरम असणे महत्त्वाचे आहे. तसेच, भाजणीतील डाळी आणि तांदूळ व्यवस्थित भाजले गेल्याशिवाय चकलीला चांगली चव येत नाही.
Crispy Chakli Recipe
Sakal
Rava Laddu Recipe
Sakal