Aarti Badade
दिवाळी असो वा कोणताही सण, रव्याचे लाडू सगळ्यांना आवडतात. हे लाडू साखरेचा पाक न करता, झटपट आणि अगदी खुसखुशीत कसे बनवायचे, ते पाहा!
Rava Laddu Recipe
Sakal
या लाडवांसाठी आपल्याला फक्त मोजके साहित्य लागते बारीक रवा,साजूक तूप,साखर,वेलची पूड,मीठ (चवीसाठी),बेदाणे (मनुका),शेंगदाणे (आवडीप्रमाणे)
Rava Laddu Recipe
Sakal
एका कढईत साजूक तूप गरम करा. त्यात बारीक रवा घालून घ्या. रवा सोनेरी रंगावर येईपर्यंत आणि चांगला सुटेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
Rava Laddu Recipe
Sakal
रवा भाजून झाल्यावर त्याच तुपात बेदाणे आणि शेंगदाणे चांगले परतून घ्या. भाजलेला रवा एका भांड्यात काढून त्यात साखर आणि वेलची पूड मिसळा.
Rava Laddu Recipe
Sakal
भाजलेले बेदाणे आणि शेंगदाणे रव्याच्या मिश्रणात चांगले एकत्र करा. हे मिश्रण करताना त्यात साखरेचा पाक न घालता फक्त तूप आणि साखर वापरली जाते.
Rava Laddu Recipe
Sakal
सर्वात महत्त्वाची टीप: मिश्रण कोमट असतानाच लहान लाडू पटापट वळा. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यास लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत.
Rava Laddu Recipe
Sakal
तयार आहेत तुमचे तोंडात विरघळणारे आणि खुसखुशीत रव्याचे लाडू! पाकाची चिंता न करता, तुम्ही अगदी कमी वेळेत हे गोड पदार्थ तयार करू शकता.
Rava Laddu Recipe
Sakal
Karanji Tips
Sakal