दिवाळी स्पेशल: फक्त १५ मिनिटांत बनवा स्वादिष्ट घरगुती काजू कतली!

सकाळ डिजिटल टीम

काजू कतली

या दिवाळीला अगदी बाहेर मिठाईच्या दुकानात मिळते तशी काजू कतली घरच्या घरी कशी करावी जाणून घ्या.

kaju katli recipe

|

sakal

तयारी

वेळ वाचवण्यासाठी, काजूची पावडर आणि साहित्य (साखर, पाणी) आधीच मोजून तयार ठेवा.

kaju katli recipe

|

sakal

काजू पावडर

मिक्सरमध्ये काजूची पावडर तयार करताना, मिक्सर चालू-बंद-चालू (Pulse Mode) पद्धतीनेच वापरा, ज्यामुळे काजूचे तेल सुटणार नाही आणि पावडर चिकट होणार नाही.

kaju katli recipe

|

sakal

पाक अचूकता

काजू कतली जलद आणि चांगली होण्यासाठी, पाकाची एक तारी (Single String) कन्सिस्टन्सी अचूक असावी. पाक जास्त घट्ट झाल्यास कतली लगेच कडक होईल.

kaju katli recipe

|

sakal

साखरेचा पाक

साखरेचा पाक बनवताना मध्यम आचेऐवजी मोठ्या आचेचा वापर करा (पण लक्ष ठेवा) म्हणजे साखर लवकर विरघळून पाक तयार होईल.

kaju katli recipe

|

sakal

गुठळ्या टाळा

साखरेच्या पाकात काजू पावडर घालताना, मंद आचेवर सतत वेगाने ढवळा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत आणि मिश्रण पटकन एकजीव होईल.

kaju katli recipe

|

sakal

जास्त न शिजवणे

मिश्रण कढई सोडायला लागताच लगेच गॅस बंद करा. जास्त शिजवल्यास कतली कडक आणि कोरडी होते. १५ मिनिटांत मिश्रण काढणे महत्त्वाचे आहे.

kaju katli recipe

|

sakal

गरम मळणे

मिश्रण थोडे कोमट असतानाच (हताला सोसवेल इतके गरम) लगेच बटर पेपरवर घेऊन मळून घ्या, यामुळे ते मऊ राहते आणि वड्या लवकर पडतात.

kaju katli recipe

|

sakal

जाडसर लाटणे

लगेच बटर पेपरच्या मदतीने गोळा जाडसर लाटून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर लाटणे कठीण होते आणि वेळ वाया जातो. लाटलेल्या मिश्रणावर लगेच चांदीचा वर्ख लावा (असल्यास) आणि पूर्ण थंड होण्याची वाट न बघता तिरके काप देऊन वड्यांचा आकार द्या.

kaju katli recipe

|

sakal

बिस्किटासारख्या खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटणाऱ्या गव्हाच्या शंकरपाळ्या कशा बनवाल?

Sakal

येथे क्लिक करा