Monika Shinde
उटणं म्हणजे हळद,क चंदन, डाळी वगैरे एकत्र करून बनवलेलं एक नैसर्गिक लेप आहे. दिवाळीच्या पहाटे उटणं लावण्याची परंपरा खूप जुनी आहे.
दिवाळीत उटणे लावण्याची परंपरा केवळ शारीरिक स्वच्छतेसाठी नसून, ती आयुर्वदिक उपचारांची एक पद्धत आहे.
उटणं लावण्याने त्वचेवरचं मळ, तेल आणि मृत पेशी निघून जातात. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज आणि उजळपणा मिळतो. दिवाळीसाठी हे एक उत्तम सौंदर्य उपचार आहे.
उटणं लावल्याने फक्त शरीरच नव्हे, तर मनही प्रसन्न राहतं. त्याचा थंडावा आणि सुगंधामुळे सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते.
उटणाचे घटक शरीरातील दुर्गंधी दूर करतात. हळद आणि चंदनासारख्या सुगंधी औषधी घटकांमुळे दिवाळीच्या दिवसात दिवसभर ताजेपणा राहतो.
आयुर्वेदानुसार उटणं लावल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित होते. त्यामुळे सांधेदुखी, पुरळ, त्वचेची खाज यासारख्या समस्यांवर आराम मिळतो.
उटणं लावल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि मन प्रसन्न होत