दिवाळीच्या फराळात कोणते तिखट पदार्थ बनतात?

Aarti Badade

दिवाळीच्या फराळातील तिखट पदार्थ कोणते?

दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांसोबत चकली, चिवडा, तिखट शेव आणि खाऱ्या शंकरपाळ्यांसारखे कुरकुरीत पदार्थही आवडीने बनवले जातात.

Diwali Faral

|

sakal

भाजणीची कुरकुरीत चकली

तांदूळ आणि विविध डाळींच्या भाजणीपासून तयार होणाऱ्या चकलीमध्ये लाल तिखट, ओवा आणि तीळ घातले जातात. त्यामुळे चकलीला खमंग चव आणि कुरकुरीतपणा मिळतो.

Diwali Faral

|

sakal 

खमंग पोहा चिवडा

पातळ पोहे, शेंगदाणे, काजू, कढीपत्ता आणि हिरवी मिरची वापरून चिवडा तयार केला जातो. चवीनुसार त्यात तिखट आणि चिवडा मसाला घालता येतो.

Diwali Faral poha chivda

|

Sakal

तिखट भडंग चिवडा

मुरमुरे, शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता आणि मसाल्यांचा वापर करून झणझणीत भडंग चिवडा बनवता येतो. चहासोबत खाण्यासाठी हा एक लोकप्रिय फराळाचा पदार्थ आहे.

Diwali Faral

|

sakal

तिखट आणि लसूण शेव

बेसन, ओवा, हळद आणि लाल तिखट वापरून कुरकुरीत शेव बनवली जाते. त्यात लसूण घातल्यास शेवेला अधिक खमंग आणि झणझणीत चव येते.

Diwali Faral

|

sakal

खाऱ्या शंकरपाळ्या

मैदा किंवा गव्हाचे पीठ, मीठ, ओवा, जिरे आणि तिखट वापरून खाऱ्या शंकरपाळ्या तयार करता येतात. छोट्या आकारात कापून तळल्यावर त्या कुरकुरीत होतात.

Khare Shankarpali

|

Sakal

घरच्या फराळात आणा झणझणीत चव

चकली, चिवडा, शेव आणि खाऱ्या शंकरपाळ्यांसारखे पदार्थ घरच्या घरी तयार करून दिवाळीच्या फराळात विविधता आणता येते. तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा.

Diwali Faral Hacks

|

Sakal

झटपट बनवा तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली!

Rice Flour Chakli

|

esakal

येथे क्लिक करा