झटपट बनवा तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली!

Aarti Badade

तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली!

दिवाळीच्या फराळासाठी कमी वेळात तयार होणारी तांदळाच्या पिठाची चकली घरच्या घरी सहज बनवता येते.

Rice Flour Chakli

|

esakal

चकलीसाठी लागणारे साहित्य

चार कप तांदळाचे पीठ, एक कप बेसन किंवा भाजलेल्या डाळीचे पीठ, तीळ, ओवा, जिरे, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ आणि तेल घ्या.

Rice Flour Chakli

|

esakal

पिठात मसाले मिसळा

एका परातीत तांदळाचे पीठ आणि बेसन एकत्र करून त्यात तीळ, ओवा, जिरे, तिखट, हळद, हिंग आणि मीठ घाला.

Rice Flour Chakli

|

esakal

पिठाला द्या गरम तेलाचे मोहन

तीन ते चार चमचे तेल कडक गरम करून पिठात घाला आणि चमच्याने सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

Rice Flour Chakli

|

esakal

तयार करा पिठाची उकड

पाणी उकळवून त्यात थोडे मीठ आणि तेल घाला, नंतर हे गरम पाणी पिठात थोडेथोडे मिसळून झाकण ठेवून दहा मिनिटे वाफ द्या.

Rice Flour Chakli

|

esakal

मळून घ्या मऊसर पीठ

वाफवलेले पीठ परातीत काढून कोमट असतानाच व्यवस्थित मळा आणि गरजेनुसार पाण्याचा हात लावून मऊसर गोळा तयार करा.

Rice Flour Chakli

|

esakal

सोऱ्याने पाडा चकल्या

चकलीच्या सोऱ्याला तेल लावून त्यात पिठाचा गोळा भरा आणि प्लास्टिकच्या कागदावर किंवा ताटात गोलाकार चकल्या पाडा.

Crispy Chakli recipe

|

sakal

मध्यम आचेवर तळून घ्या

गरम तेलात चकल्या सोडून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Rice Flour Chakli

|

Sakal

कुरकुरीत चकल्या साठवून ठेवा

तळलेल्या चकल्या पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा, म्हणजे त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहील.

Crispy Chakli Recipe

|

Sakal

शिवकाळात दिवाळी कशी साजरी व्हायची?

Diwali during Shivaji Maharaj era

|

Sakal

येथे क्लिक करा