Aarti Badade
चिरोटे (Chirote) हा दिवाळी फराळातील खास पदार्थ आहे. करंजीसाठी मळलेल्या पिठातून आपण झटपट चिरोटे बनवू शकतो. हे खुसखुशीत चिरोटे बनवण्याची सोपी रेसिपी पाहा!
Chirote Recipe
Sakal
पीठासाठी : १.५ वाटी मैदा, ३/४ वाटी रवा, चिमूटभर मीठ, २ चमचे कडकडीत तूप (मोहनसाठी).साटासाठी : ४ चमचे तूप, ५ चमचे कॉर्नफ्लॉवर.इतर : तळण्यासाठी तेल, ३/४ वाटी पिठीसाखर.
Chirote Recipe
Sakal
मैदा, रवा आणि मीठ एकत्र करा. तूप गरम करून कडकडीत मोहन घाला. ते पिठाला चांगले चोळून घ्या. घट्ट कणिक मळून २ ते २.५ तास ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा.
Sakal
साटा: तूप हलके होईपर्यंत फेटून घ्या. त्यात कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करा. साटा तयार आहे.
रोल: पिठाचे गोळे करून चार पोळ्या लाटा. प्रत्येक पोळीवर साटा लावून थर लावा. याचा घट्ट रोल (Roll) बनवा.
Sakal
रोल कापून त्याचे गोळे करा. कापलेल्या गोळ्याला मध्ये दाबून त्याची बारीक पारी लाटा. (जास्त जाड किंवा पातळ नसावी). याप्रमाणे सर्व चिरोटे लाटून घ्या.
Sakal
कढईत तेल तापत ठेवा. मंद ते मध्यम गॅसवर चिरोटे खरपूस आणि सोनेरी रंगावर तळून घ्या. चिरोटे तळताना तेलाचे तापमान नियंत्रित ठेवा.
Sakal
तळलेले चिरोटे एका प्लेटमध्ये काढून घ्या. गरम असतानाच त्यावर पिठीसाखर भुरभुरून घ्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हे चिरोटे खारीसारखे खुसखुशीत लागतात!
Sakal
Crispy thick Poha Chivda Recipe
Sakal