Aarti Badade
वय वाढते तसे शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होऊ लागतात. यामुळे सांधेदुखी आणि थकवा जाणवतो.
Home remedy for bone strength
Sakal
चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, सूर्यप्रकाशाची कमतरता आणि जंक फूडचे अतिसेवन यामुळे हाडांची घनता झपाट्याने घटते.
Home remedy for bone strength
Sakal
हाडांच्या बळकटीसाठी एक खास घरगुती पावडर , जी ओमेगा-३ आणि कॅल्शियमने समृद्ध आहे.
Home remedy for bone strength
Sakal
अळशी, तीळ, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, बदाम, काजू, हळद, जिरे, धणे, मिरी आणि बडीशेप या नैसर्गिक घटकांपासून ही पावडर तयार होते.
Home remedy for bone strength
Sakal
या बियांमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स शरीरातील सूज कमी करतात, तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना लोखंडासारखे मजबूत बनवण्यास मदत करतात.
Home remedy for bone strength
Sakal
सर्व बिया मंद आचेवर हलक्या भाजून घ्या. बदाम-काजू तुपात परता. सर्व घटक थंड झाल्यावर त्यांची बारीक पूड करून हवाबंद काचेच्या बरणीत साठवा.
Home remedy for bone strength
Sakal
दिवसातून एक ते दोन वेळा १-२ चमचे पावडर जेवणानंतर कोमट दूध किंवा पाण्यासोबत घ्या. नियमित सेवनाने सांध्यांच्या हालचालीत सुधारणा जाणवेल.
Home remedy for bone strength
Sakal
हा उपाय नैसर्गिक असला तरी प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे कोणताही दीर्घकालीन वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Home remedy for bone strength
sakal
rose water Fitkari toner for glowing skin
Sakal