Anushka Tapshalkar
त्वचेतील मृतपेशी सक्रियपणे काढण्यासाठी आणि चेहऱ्याचे एक्सफॉलिएशन करण्यासाठी कॉफी वापरली जाऊ शकते. कॉफीचे मॉइश्चरायझिंग प्रभाव त्वचेचे UV Rays पासून संरक्षण करतात. चला तर मग जाणून घेऊयात हे कॉफी स्क्रब्स...
कॉफी, हळद आणि दही हे प्रत्येकी १-१ चमचा घ्या. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेऊन योग्यरित्या ढवळा. २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचा उजळते आणि टवटवीत दिसते.
१ चमचा कॉफे आणि २ चमचे दूध एकत्र फेटून पेस्ट तयार करा. नंतर चेहऱ्यावर लावून १०-१५ मिनिटांनी धुवा. त्वचेतील अशुद्धता काढून टाकण्यासाठी आणि इव्हन-टोन त्वचेसाठी हे स्क्रब नक्की ट्राय करा.
तुम्हाला जर डार्क सरकल्स असतील आणि तुमचे डोळे सतत सुजलेले दिसत असतील तर १ चमचा कॉफी आणि १ चमचा खोबरेल तेल एकत्र करा. दररोज १० मिनिटे डोळ्याभोवती हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डोळ्याभोवतीची त्वचा उजळेल.
२ चमचे कॉफी पावडर आणि १ चमचा मध चांगले मिक्स करा. २० मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. नंतर गार पाण्याने स्वच्छ धुवा. सुजलेले डोळे, सुरकुत्या आणि डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी या स्क्रबचा वापर करू शकता.
१ चमचा कॉफी आणि १ मोठा चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्या. हा स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहरा त्वरित चमकतो आणि मृतपेशी नाहीश्या होतात.
जे पिंपल्सच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी ३ मोठे चमचे कॉफी पावडर, १ मोठा चमचा बेसन पीठ, ३ चमचे मध आणि २ चमचे ऍलो व्हेरा जेल मिक्स करा. संपूर्ण चेहऱ्यावर योग्यरित्या लावा आणि २० मिनिटांनी धुवा.
निस्तेज त्वचा आणि पिंपल्सच्या समस्या दूर करण्यासाठी हा एक उत्तम आणि प्रभावी स्क्रब आहे. २ चमचे कॉफी पावडर आणि २ चमचे ऍलो व्हेरा जेल एकत्र करा. २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.