जेवणानंतर पचन सुधारेल अन् तोंडही राहिल फ्रेश; असा बनवा 'मल्टी-सीड्स मुखवास'!

Aarti Badade

भारतीय जेवणाची अपूर्ण ओळख

मुखवासाशिवाय कोणतेही भारतीय जेवण पूर्ण होत नाही; तो केवळ चवीसाठी नसून पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि अपचन रोखण्यासाठी उत्तम मानला जातो.

Homemade mukhwas recipe

|

Sakal

लागणारे आवश्यक साहित्य

हा पौष्टिक मुखवास बनवण्यासाठी पांढरे आणि काळे तीळ, अळशीच्या बिया (Flax Seeds), बडीशेप, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या.

Homemade mukhwas recipe

|

Sakal

बियांचे खास मिश्रण तयार करा

एका मोठ्या बाऊलमध्ये सर्व बिया एकत्र करा; त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.

Homemade mukhwas recipe

|

Sakal

लिंबाचा रस शोषून घेऊ द्या

बियांचे मिश्रण बाऊलमध्ये झाकून ठेवा आणि सुमारे एक तास बाजूला ठेवा, जेणेकरून बिया लिंबाचा रस नीट शोषून घेतील.

Homemade mukhwas recipe

|

Sakal

मंद आचेवर कोरडे भाजून घ्या

मिश्रण एक तासानंतर नॉन-स्टिक पॅनमध्ये घ्या आणि छान सुगंध येईपर्यंत सतत ढवळत राहून कोरडे भाजून (Dry Roast) घ्या.

Homemade mukhwas recipe

|

Sakal

गोडव्यासाठी खास टीप

जर तुम्हाला मुखवास गोड हवा असेल, तर बिया भाजून थंड झाल्यावर त्यात थोडी पिठीसाखर किंवा बडीशेपची साखर मिसळू शकता.

Homemade mukhwas recipe

|

Sakal

स्टोअर आणि सर्व्ह करा

तयार झालेला मुखवास पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर तो हवाबंद डब्यात साठवा; दररोज जेवणानंतर याचा आस्वाद घ्या!

Homemade mukhwas recipe

|

Sakal

रात्री झोपण्यापूर्वी 'हा' ड्रायफ्रूट खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान!

Benefits of eating pistachios at night

|

Sakal

येथे क्लिक करा