Anushka Tapshalkar
धकाधकीच्या जीवनात, आणि वाढत्या प्रदूषणामुळे आपला चेहेरा खराब होतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन A, C, E मुबलक प्रमाणात असते, जे त्वचेला उजळवते आणि जळजळ कमी करते.
उजळ त्वचेसाठी घरच्या घरी DIY टोमॅटो फेस स्क्रब बनवून त्याचा नियमितपणे वापर केल्यास त्याचे परिणाम दिसून येतील.
१ पिकलेला टोमॅटो, १ चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस
मिक्सर मध्ये टोमॅटोची पेस्ट तयार करून घ्या.
एका स्वच्छ वाटीत तयार केलेली टोमॅटोची पेस्ट, साखर, लिंबाचा रस हे एकत्र करा. आणि नीट मिक्स करून घ्या. तुमचे स्क्रब तयार आहे.
हे तयार झालेले स्क्रब चेहरा व मानेवर एकसमान लावा. २ ते ५ मिनिटे हलक्या हाताने वर्तुळाकार हालचालींनी मसाज करा.
आता साध्य पाण्याने चेहरा धुवा व स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर थोडे मॉइश्चरायझरलावा.
कोणतीही नवीन गोष्ट वापरण्यापूर्वी हातावर किंवा मानेवर पॅच टेस्ट नक्की करा, म्हणजे त्या नवीन गोष्टीची अॅलर्जी आहे की नाही याची खात्री होईल.