Anushka Tapshalkar
प्रॉपर डाएट आणि वर्कआउट असूनही वजन कमी होत नसेल, तर त्यामागे तुमच्या दैनंदिन सवयी कारणीभूत असू शकतात.
वजन घटवण्यासाठी केवळ कमी खाणं आणि जिममध्ये घाम गाळणं पुरेसं नसतं. शरीराची एकंदर जीवनशैली, झोप, पचन, तणाव हे घटकही महत्त्वाचे असतात.
लहान वाटणाऱ्या सवयी तुमच्या वजन घटवण्याच्या प्रयत्नांना अडथळा ठरू शकतात, त्यामुळे त्या ओळखून वेळेवर सुधारणं आवश्यक आहे.
पोट भरल्याचं मेंदूला समजायला वेळ लागतो. झपाट्याने जेवल्यास जास्त खाल्लं जातं आणि वजन वाढतं.
तहान आणि भूक यांच्यात गोंधळ होतो. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने क्रेविंग्स कमी होतात.
झोप कमी झाली की भूक वाढते आणि वजन घटणं कठीण होतं.
दिवसभर हलचाल नसेल तर वर्कआउटचा फायदा मर्यादित राहतो.
स्ट्रेसमुळे शरीर चरबी साठवण्याच्या प्रक्रियेत अडकतं, विशेषतः पोटाभोवती.