Anushka Tapshalkar
केळाचे साल, अनेकदा कचरा समजले जात असले तरी ते पोषकतत्त्वांनी समृद्ध असून त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी, ई, पोटॅशियम आणि खनिजांनी समृद्ध केळीची साल, मॉइश्चरायझिंग, अँटीइन्फ्लमेटरी आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी ओळखली जाते.
केळाचे साल डार्क सर्कल्स, मुरुम, त्वचा उजळवणे आणि ऍक्झिमा-सोरायसिससाठी उपयुक्त असून, ते कोलेजन वाढवून त्वचेची लवचिकता सुधारते.
अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध केळीची साल त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तुम्हला देखील तजेलदार त्वचा हवी असेल तर पुढे दिलेल्या DIY पद्धतींचा नक्की वापर करा.
पिकलेल्या केळाच्या सालीचा आतील भाग मॅश करा आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. हे त्वचेला मॉइश्चरायझ करून सुरकुत्या कमी करते.
केळाच्या सालीच्या आतील बाजूस चिमूटभर हळद मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ती त्वचेवर लावून 15 मिनिटांनी धुवा. हे निस्तेज त्वचा उजळण्यास मदत करते.
ताज्या केळाची साल पिंपल्सवर चोळून १०-१२ मिनिटांनी धुवा. केळाच्या सालाचे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेवरील लालसरपणा आणि जळजळ कमी करतात.
केळाच्या सालीचे तुकडे करून आतील बाजू डोळ्यांखाली ठेवून 10-15 मिनिटे ठेवा. हे डोळ्यांना आलेली सूज आणि डार्क सर्कल्स कमी करते.
केळाच्या सालीचा आतील भाग कोपर, गुडघे व पायांसारख्या खडबडीत भागांवर चोळा. हे त्वचा मऊ व हायड्रेट ठेवते.