Anushka Tapshalkar
अनेक महिलांना पाळीत हलका रक्तस्राव, अनियमितता, जास्त रक्तस्राव, गाठी वा उशिरा येणं असे त्रास होतात. हे शरीरातील असंतुलनाचं संकेत असू शकतात.
परंतु औषधे घेण्याऐवजी काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांमुळे पाळीचे चक्र नैसर्गिक पद्धतीने सुधारू शकते.
हलक्या पाळीसाठी तीळ आणि गुळाचे पाणी उपयुक्त आहे. १ टीस्पून भाजलेला तीळ पूड करून गरम पाण्यात गुळ मिसळा आणि पाळीच्या आठवडाभर आधी रोज प्या.
दालचिनी रक्तप्रवाह सुधारते त्यामुळे अनियमित पाळीसाठी दालचिनी चहा फायदेशीर आहे. १ लहान दालचिनीचा तुकडा १ कप पाण्यात १० मिनिटे उकळवून गाळा आणि रोज एकदा प्या.
जास्त रक्तस्राव आणि गाठींसाठी धण्याचे पाणी उपयुक्त ठरते. धणे शरीरातील दाह कमी करून गर्भाशय शांत करतात, ज्यामुळे रक्तस्राव नियंत्रित होतो. १ टीस्पून धणे २ कप पाण्यात उकळवून सुमारे १ कप शिल्लक होईपर्यंत उकळवा व गरम प्या.
पाळी उशिरा येत असल्यास अळीव बिया उपयोगी ठरतात. त्यात लोहतत्त्व व पाळीस चालना देणारे घटक असतात. १ टीस्पून बिया रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी गरम दूधात किंवा पाण्यात घ्या.
उदरातील स्नायूंना आराम देण्यासाठी दिवसातून २–३ वेळा गरम पाणी प्या.
हार्मोन्सचा समतोल राखण्यासाठी योगा, चालणे किंवा सौम्य व्यायाम नियमितपणे करावा.
ताणतणावामुळे पाळीचं चक्र असंतुलित होऊ शकतं, त्यामुळे दररोज ध्यान आणि श्वसन तंत्रांचा नियमित सराव करावा.
हिरव्या भाज्या, फळे आणि सुकामेवा यासारखे पोषक अन्न सेवन केल्याने हार्मोन्सचा समतोल राखला जातो आणि पाळी नियमित होण्यास मदत होते.
पाळीचे त्रास सतत होत असतील, तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. काही वेळा त्रासामागे गंभीर कारणेही लपलेली असू शकतात.