उन्हामुळे चक्कर येतेय? उष्माघाताचा धोका वाढतोय! ‘हे’ उपाय नक्की करा

Aarti Badade

उन्हाचा शरीरावर थेट परिणाम

वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाणी कमी होऊन चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येण्याचे प्रकार वाढतात.

Dizziness due to sun remedies

|

Sakal

चक्कर येण्याचे मुख्य कारण

कडक उन्हात जास्त घाम आल्याने शरीरातील मीठ आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

Dizziness due to sun remedies

|

Sakal

सावलीत विश्रांती

चक्कर आल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने उन्हातून बाजूला काढून थंड हवेच्या ठिकाणी किंवा सावलीत झोपवावे.

Dizziness due to sun remedies

|

Sakal

पाय उंच ठेवा

व्यक्तीला झोपवल्यानंतर त्याचे पाय डोक्याच्या पातळीपेक्षा थोडे उंच ठेवावेत, जेणेकरून मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुधारेल.

Dizziness due to sun remedies

|

Sakal

जलसंजीवनीचा वापर

अशक्तपणा वाटत असल्यास हळूहळू लिंबूपाणी, ताक किंवा ओआरएस (ORS) चे द्रावण प्यायला द्यावे.

Dizziness due to sun remedies

|

Sakal

शरीराचे तापमान कमी करा

कपाळावर किंवा मानेवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने शरीरातील वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते.

Dizziness due to sun remedies

|

Sakal

खबरदारी आणि डॉक्टरांचा सल्ला

जर वारंवार उलट्या होत असतील किंवा शुद्ध हरपत असेल, तर घरगुती उपायांवर न थांबता त्वरित डॉक्टरांकडे जावे.

Dizziness due to sun remedies

|

Sakal

शरीर देतंय इशारा! बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर दिसतात ‘ही’ ८ लक्षणे

bad cholesterol signs

|

Sakal

येथे क्लिक करा