Aarti Badade
कोलेस्टेरॉल वाढल्याची सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच याला 'सायलेंट किलर' म्हटले जाते. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा शरीर काही संकेत देते.
bad cholesterol signs
Sakal
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. परिणामी, छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवू लागते.
bad cholesterol signs
Sakal
जेव्हा शरीरातील पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत नाहीत, तेव्हा साध्या कामातही उत्साह राहत नाही आणि सतत थकवा जाणवतो.
bad cholesterol signs
Sakal
हृदयावर ताण आल्यामुळे फुफ्फुसांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. थोड्या पायऱ्या चढल्या किंवा चालले तरी लगेच धाप लागते.
bad cholesterol signs
Sakal
नसांमधील रक्तप्रवाह मंदावल्यामुळे हाता-पायांना वारंवार मुंग्या येणे, पाय थंड पडणे किंवा बधीरपणा जाणवणे ही लक्षणे दिसतात.
bad cholesterol signs
Sakal
डोळ्यांच्या पापण्यांभोवती कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे पिवळसर डाग दिसतात, याला वैद्यकीय भाषेत 'झँथिलास्मा' असे म्हणतात.
bad cholesterol signs
Sakal
मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास डोकं जड होणे किंवा वारंवार चक्कर येण्याचे प्रकार घडू शकतात.
bad cholesterol signs
sakal
कोलेस्टेरॉल वाढल्याचा परिणाम यकृतावर (Liver) होतो, ज्यामुळे पित्त वाढणे, मळमळ होणे किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
bad cholesterol signs
Sakal
मेयो क्लिनिकनुसार, कोलेस्टेरॉल तपासण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग म्हणजे 'लिपिड प्रोफाईल' ही रक्ताची चाचणी करणे होय.
bad cholesterol signs
Sakal
Urine Color & Kidney Health
Sakal