DJ म्हणजे काय? ९९ टक्के लोकांना फुलफॉर्म माहिती नसेल...

Shubham Banubakode

DJ ची धूम

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत DJ चा आवाज, मोठे स्पीकर आणि लेझर लाइट्स दिसतात. पण DJ या दोन अक्षरांचा नेमका अर्थ कितीजणांना माहिती आहे?

DJ Full Form

|

esakal

DJ चा फुल फॉर्म काय?

आपण सर्रास DJ म्हणतो, पण त्याचं पूर्ण नाव आहे Disc Jockey. म्हणजे संगीताच्या तबकड्या हाताळून गाणी वाजवणारा आणि मिक्स करणारा कलाकार.

DJ Full Form

|

esakal

हा शब्द कुठून आला?

DJ हा शब्द आजच्या पार्टी संस्कृतीतून आलेला नाही. अमेरिकेत रेडिओच्या सुरुवातीच्या काळात गाणी वाजवणाऱ्या व्यक्तीसाठी या शब्दाचा वापर सुरू झाला.

DJ Full Form

|

esakal

सुरुवात रेडिओपासून

१९३५ मध्ये अमेरिकन रेडिओ समालोचक वॉल्टर विन्चेल यांनी रेडिओ उद्घोषक मार्टिन ब्लॉक यांच्यासाठी ‘DJ’ हा शब्द वापरल्याचं सांगितलं जातं.

DJ Full Form

|

esakal

Disc म्हणजे काय?

त्या काळात आजसारखी डिजिटल गाणी नव्हती. संगीत प्लास्टिकच्या गोल तबकड्यांवर म्हणजेच रेकॉर्ड्सवर असायचं. याच ‘Disc’ वरून पहिला शब्द आला.

DJ Full Form

|

esakal

मग Jockey कुठून आलं?

गाणी योग्य पद्धतीने बदलणं, त्यांचा ताल जुळवणं आणि श्रोत्यांचा मूड पकडणं ही कौशल्याची गोष्ट होती. त्यामुळे अशा कलाकाराला ‘Jockey’ म्हटलं जाऊ लागलं.

DJ Full Form

|

esakal

काळ बदलला

पूर्वी DJ हाताने रेकॉर्ड बदलायचे. आता लॅपटॉप, पेनड्राइव्ह, डिजिटल मिक्सर आणि आधुनिक सॉफ्टवेअर वापरलं जातं; मात्र ‘DJ’ हे नाव तसंच राहिलं.

DJ Full Form

|

esakal

मोठी गोष्ट

आज पुण्यापासून जगभरातील पार्ट्या आणि उत्सवांमध्ये DJ चा बोलबाला आहे. पण पुढच्या वेळी DJ ऐकलं की त्याचा अर्थ Disc Jockey नक्की आठवा.

DJ Full Form

|

esakal

अमरावतील्या 'या' मंदिरात श्रीकृष्णानं तीन दिवस केलं होतं मुक्काम

Matakhidki mandir History in marathi

|

esakal

हेही वाचा -