DMart मध्ये सर्वात स्वस्त काय मिळतं? जाणून घ्या बजेट-फ्रेंडली वस्तूंची यादी

Aarti Badade

डीमार्ट: सामान्यांचे शॉपिंग डेस्टिनेशन!

किराणा असो वा घरगुती वस्तू, डीमार्टमध्ये ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. पण तुम्हाला माहितीये का, डीमार्टमध्ये वस्तू इतर ठिकाणांपेक्षा स्वस्त का मिळतात?

Best Things to Buy at DMart

|

Sakal

काय आहे 'EDLP' मॉडेल?

डीमार्ट 'एव्हरीडे लो प्राईस' (Everyday Low Price) मॉडेलवर काम करते. येथे सणासुदीची वाट न पाहता, वर्षाचे ३६५ दिवस ग्राहकांना एमआरपीपेक्षा कमी दरात वस्तू मिळतात.

Best Things to Buy at DMart

|

Sakal

मोठ्या प्रमाणात खरेदी

डीमार्ट कंपन्यांकडून थेट आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात माल खरेदी करते. मोठ्या ऑर्डर्समुळे त्यांना कंपन्यांकडून भरघोस सवलत मिळते, ज्याचा फायदा ते थेट ग्राहकांना देतात.

Best Things to Buy at DMart

|

Sakal

सर्वात जास्त बचत कशावर होते?

धान्य, डाळी, मसाले, साखर आणि तेल यांसारख्या किराणा मालावर डीमार्टमध्ये मोठी बचत होते. तसेच साबण, डिटर्जंट आणि क्लिनिंग प्रॉडक्ट्सवर नेहमी 'बाय १ गेट १' सारख्या ऑफर्स असतात.

Best Things to Buy at DMart

|

sakal

कपडे आणि घरगुती वस्तू

लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे टी-शर्ट्स आणि घरगुती वापराची भांडी येथे आश्चर्यकारक किमतीत उपलब्ध असतात. कमी खर्चात स्टायलिश दिसण्यासाठी डीमार्ट हा उत्तम पर्याय आहे.

Best Things to Buy at DMart

|

Sakal

खर्चात कपात, ग्राहकांचा फायदा!

डीमार्ट जाहिरातींवर जास्त खर्च करत नाही आणि त्यांचे स्टोअर्स साध्या पद्धतीने चालवतात. हा वाचलेला पैसा ते किमती कमी करण्यासाठी वापरतात, ज्यामुळे ग्राहकांना स्वस्त वस्तू मिळतात.

Best Things to Buy at DMart

|

Sakal

कोणत्या दिवशी जावे?

डीमार्टमध्ये ठराविक वस्तूसाठी कोणताही 'स्वस्त दिवस' नसतो. ऑफर्स दररोज बदलतात. मात्र, शांतपणे खरेदी करायची असेल तर विकेंड (शनिवार-रविवार) टाळून आठवड्याच्या मधल्या दिवशी जाणे उत्तम!

Best Things to Buy at DMart

|

Sakal

स्मार्ट खरेदीचा मंत्र

खरेदीला जाण्यापूर्वी आपली लिस्ट तयार ठेवा आणि स्टोअरमधील 'डिस्काउंट टॅग्स' नीट तपासा. डीमार्टमध्ये दररोज बचत ही ठरलेलीच आहे!

Best Things to Buy at DMart

|

Sakal

मटण खाता? मग ‘हा’ भाग निवडा; शरीराला मिळतील जबरदस्त फायदे

Nutritional secrets of mutton parts

|

Sakal

येथे क्लिक करा