Aarti Badade
हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि ताकद देण्यासाठी मटण खाणे अनेकजण पसंत करतात. पण तुम्हाला माहितीये का, मटणाचा प्रत्येक भाग शरीरासाठी वेगळ्या प्रकारे फायदेशीर असतो?
Nutritional secrets of mutton parts
asb02
मटणाच्या लिव्हरमध्ये लोह (Iron) आणि व्हिटॅमिन B12 मुबलक असते. ज्यांना अशक्तपणा किंवा हिमोग्लोबिन कमी होण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा कलेजी खाणे वरदान ठरू शकते.
Nutritional secrets of mutton parts
Sakal
मटणाच्या पायाचे सूप (Paya Soup) कॅल्शियम आणि कोलेजनने समृद्ध असते. हे केवळ हाडे मजबूत करत नाही, तर सर्दी-खोकला आणि कमजोरी घालवण्यासाठीही गुणकारी मानले जाते.
Nutritional secrets of mutton parts
Sakal
मटण बोटीमध्ये व्हिटॅमिन A, B12, D आणि K भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात.
Nutritional secrets of mutton parts
Sakal
जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर कमी चरबीचे 'लीन मटण' निवडा. हे प्रथिनांचा (Protein) उत्तम स्रोत असून स्नायू मजबूत करण्यास मदत करते.
Nutritional secrets of mutton parts
Sakal
मटण खाल्ल्याने शरीराला नैसर्गिकरीत्या उष्णता मिळते. हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मटणाचे पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात.
Nutritional secrets of mutton parts
Sakal
मटण जास्त तेलात तळण्यापेक्षा ते उकडून, रस्सा किंवा सूप स्वरूपात खाणे अधिक आरोग्यदायी असते. यामुळे त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात आणि चरबीचे प्रमाण कमी राहते.
Nutritional secrets of mutton parts
Sakal
मटण कितीही पौष्टिक असले तरी ते मर्यादित प्रमाणातच खावे. संतुलित आहाराचा भाग म्हणून मटणाचा समावेश केल्यास ते चवीसोबतच उत्तम आरोग्यही देते!
Nutritional secrets of mutton parts
Sakal
Surmai Fry Recipe
Sakal