मानवाप्रमाणे प्राण्यांनाही मासिक पाळी येते का? जाणून घ्या यामागचे रंजक विज्ञान!

सकाळ डिजिटल टीम

मासिक पाळी

प्राण्यांना देखील मासिक पाळी येते हे तुम्ही कधी एकले आहे का? जाणून घ्या काय आहे या मागचे विज्ञान

animal menstruation

|

sakal 

दोन प्रकारची चक्रे

सस्तन प्राण्यांमध्ये पुनरुत्पादनासाठी दोन प्रकारची चक्रे असतात. एक 'मेन्स्ट्रुअल सायकल' (मासिक पाळी), जी मानवात असते आणि दुसरी 'इस्ट्रस सायकल' (Estrus Cycle), जी बहुतांश प्राण्यांमध्ये असते.

animal menstruation

|

sakal 

काही प्राण्यांनाच पाळी येते

मानवाव्यतिरिक्त केवळ प्रगत प्राइमेट्स (उदा. चिंपांझी, ओरांगुटाण), काही विशिष्ट प्रजातीची वटवाघळे आणि 'एलिफंट श्रू' (Elephant Shrew) नावाचा उंदीर या मोजक्या प्राण्यांनाच मासिक पाळी येते.

animal menstruation

|

sakal 

गर्भाशयाचे अस्तर

मासिक पाळी येणाऱ्या प्राण्यांमध्ये, गर्भधारणा न झाल्यास गर्भाशयाचे अस्तर शरीराबाहेर रक्तावाटे टाकून दिले जाते. याउलट, इतर प्राण्यांमध्ये हे अस्तर शरीरातच पुन्हा शोषून घेतले जाते.

animal menstruation

|

sakal

कुत्र्यांमधील रक्तस्त्राव

कुत्र्यांना होणारा रक्तस्त्राव ही मासिक पाळी नसते. याला 'हीट सायकल' म्हणतात. हा रक्तस्त्राव अंडमोचनाच्या (Ovulation) आधी होतो, जो मिलनासाठी तयार असल्याचे संकेत देतो. मानवात पाळी अंडमोचन झाल्यानंतर गर्भधारणा न झाल्यास येते.

animal menstruation

|

sakal 

सुप्त मासिक पाळी

अनेक सस्तन प्राण्यांमध्ये गर्भाशयाचे अस्तर गळून पडते, परंतु ते प्रमाण इतके कमी असते की ते शरीराबाहेर न येता आतल्या आत शोषले जाते. याला 'सायलेंट मेन्स्ट्रुएशन' म्हणतात.

animal menstruation

|

sakal 

मिलनाचा काळ

मासिक पाळी येणारे प्राणी (मानव, चिंपांझी) वर्षाच्या कोणत्याही काळात प्रजननास सक्षम असू शकतात. मात्र, 'इस्ट्रस सायकल' असलेले प्राणी केवळ त्यांच्या विशिष्ट 'हीट पिरियड'मध्येच मिलनासाठी तयार होतात.

animal menstruation

|

sakal 

ऊर्जेची बचत

निसर्गाच्या नियमानुसार, अस्तर शरीराबाहेर टाकण्यापेक्षा ते पुन्हा शोषून घेणे हे ऊर्जेच्या दृष्टीने फायदेशीर असते. म्हणूनच बहुतांश प्राण्यांमध्ये रक्तस्त्राव होत नाही.

animal menstruation

|

sakal 

विज्ञानाचा निष्कर्ष

थोडक्यात सांगायचे तर, रक्तस्त्राव होणारी मासिक पाळी हा निसर्गातील एक अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. ती केवळ अशाच प्राण्यांमध्ये आढळते ज्यांचे गर्भाशय गर्भाला अधिक आक्रमकपणे स्वीकारण्यासाठी विकसित झालेले असते.

animal menstruation

|

sakal 

झोपण्यापूर्वी नाभीत तेल? आयुर्वेद सांगतो आश्चर्यकारक फायदे

Navel Therapy Castor Oil Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा